July 6, 2024

पुणे: शहरात डिस्को अन पबचा उच्छाद पण परवानगी फक्त तेवीसला

पुणे, २६ जून २०२४ : पुणे शहराच्या सर्वच भागामध्ये हा अनधिकृत पब. डिस्को, रेस्टॉरंटने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री व अमली पदार्थांचे सेवन केले जात असताना पोलीस कारवाई करत नाहीत अशी स्थिती आहे. हे पब आणि बार अधिकृत असल्याचा समज नागरिकांचा होतो. मात्र, शहरांमध्ये केवळ २३ डिस्को आणि पब अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कायद्यातून समोर आलेली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे पब सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत त अॅड.समीर शेख यांनी ही माहिती पोलिसांकडून मिळवलेली आहे.

गेल्या महिन्यात कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरता आयोगात पोरशे गाडी चालवून दोन तरुणांचा जीव घेतला त्यामुळे पब रेस्टॉरंटचा प्रश्न रविवार आला नाही त्या विरोधात कारवाई सुरू झालेली आहे पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने चुकीच्या पद्धतीने दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा धडाका लावला आहे तर पुणे महापालिकेने अनधिकृत बांधलेले पद जमीनदोस्त करून टाकलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर समीर शेख यांनी माहिती अधिकार मध्ये माहिती मागवलेली होती.

पुणे पोलीसांनी माहिती समीर शेख यांच्या अर्जावर उत्तर देताना , २३ अधिकृत पब आणि डिस्को यांची यादी दिली आहे. ज्यातील एक रद्द देखील झालेली आहे . असे असताना सार्वजनिक सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या आस्थापनांच्या नियमनासाठी अधिक कठोर प्रयत्नांची आणि इच्छाशक्तीची गरज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

कायमचे बंद करण्याची मागणी

समीर शेख यातील अनधिकृत धंदे कायमचे बंद करण्याची आणि पुन्हा उघडण्याची परवानगी न देण्याची मागणी करत आहेत. अलीकडील होत असलेली कारवाई हे एक चांगले पाऊल आहे, परंतु प्राधिकरणांनी वेळेवर कारवाई करणे आणि या अनधिकृत धंद्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यापासून रोखणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे आणि यंत्रणा कायदा लागू करण्यात आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कटिबद्ध आहेत हे त्यांनी कृतिद्वारे दाखवून देणे गरजेचे आहे .

पोलीसांनी अलीकडील कारवाई, जसे मध्यरात्री दीड वाजता बंद करण्याची कठोरता आणि मद्यपान रोखण्यासाठी श्वास विश्लेषकाचा वापर, हे सकारात्मक पाऊल आहेत. परंतु हे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजे आणि यंत्रणा कायदा लागू करण्यात आणि अवैध स्थापनांचे थोड्या दिवसात पुन्हा उघडणे टाळण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे.