July 3, 2024

चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एचके पॉवर हाउस, ओबेरॉय अँड निल किंग्ज, एएसआर स्ट्रायकर्स संघांची विजयी सलामी

पुणे, 1 जुलै 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एचके पॉवर हाउस, ओबेरॉय अँड निल किंग्ज, एएसआर स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एचके पॉवर हाउस संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 266-221 असा पराभव करून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये एचके पॉवर हाउस संघाला परमार ऑल स्टार्स संघाने 52-60 असे पराभुत केले. तर, स्क्वॅशमध्ये अरहान लुंकड, आवीव कांजीलाल यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर एचके पॉवर हाऊस संघाने परमार ऑल स्टार्ससंघाचा 55-41 असा पराभव करून आघाडी घेतली. टेबल टेनिसमध्ये परमार ऑल स्टार्स संघाने एचके पॉवर हाऊस संघाचा 61-62 असा निसटता पराभव केला. टेनिसमध्ये नितिन किर्तने, जयदीप पटवर्धन, रयान साद्री, जयनील परमार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एचके पॉवर हाऊस संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 52-38 असा तर, पिकल बॉल प्रकारात एचके पॉवर हाउस संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 46-38 असा पराभव करून विजय मिळवला.

दुसऱ्या लढतीत ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाचा 275-227 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने हिलयॉस ईगल्स संघाचा 284-267 असा पराभव केला.

याआधी स्पर्धेचे उदघाटन पूना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष गौरव गढोक, पूना क्लब लिमिटेडच्या रॅकेट स्पोर्ट्स समितीचे अध्यक्ष आणि या लीगचे चेअरमन अमेय कुलकर्णी, क्लब समिती सदस्य व स्पर्धा संयोजन समिती सदस्य आदित्य कानिटकर, विराफ देबू, पंकज शहा, अमित परमार, तुषार आसवानी, शैलेश रांका, समीर संघवी, कुणाल संघवी आणि रणजीत पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: साखळी फेरी:
एचके पॉवर हाउस वि.वि.परमार ऑल स्टार्स 266-221
बॅडमिंटन: एचके पॉवर हाउस पराभुत वि.परमार ऑल स्टार्स 52-60;
स्क्वॅश: एचके पॉवर हाऊस वि.वि.परमार ऑल स्टार्स 55-41;
टेबल टेनिस: एचके पॉवर हाऊस पराभुत वि.परमार ऑल स्टार्स 61-62;
टेनिस: एचके पॉवर हाऊस वि.वि.परमार ऑल स्टार्स 52-38;
पिकल बॉल: एचके पॉवर हाउस वि.वि.परमार ऑल स्टार्स 46-38);

ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 275-227
बॅडमिंटन: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 73-51;
स्क्वॅश: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 22-62;
टेबल टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 74-54;
टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 63-24;
पिकल बॉल: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 43-34;

एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 284-267
बॅडमिंटन: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि.हिलयॉस ईगल्स 63-69;
स्क्वॅश: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 59-55;
टेबल टेनिस:एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 71-54;
टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि.हिलयॉस ईगल्स 47-52;
पिकल बॉल: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 44-37)